दुसरबीड येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणूक व हर्ष उल्हास सात प्रभू राम लल्ला चे स्वागत 🚩
दुसरबीड येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणूक व हर्ष उल्हास सात प्रभू राम लल्ला चे स्वागत
( विठ्ठल राठोड ) दुसरबीड प्रतिनिधी…
अयोध्येतील प्रभू रामचंद्र मंदिर गर्भगृहात मूर्ती प्राणप्रतिष्ठा भव्य दिव्य ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन आयोध्याप्रमाणे अखंड भारत वर्ष आणि संपूर्ण जगात मोठ्या उत्साहाने साजरे केल्या गेले तेच आयोजन दुसर बीड नगरीत भव्य दिव्य शोभायात्रा हिंदू धर्म ध्वज पताका लावून राम धुन भजन करून सर्व नगरभर या हिंदू सोहळ्याचे द्वितीय दिपावली म्हणून साजरा करण्यात आला या समयी नगरवासी यांनी आणि हिंदू संघटना आरएसएस विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू युवा वाहिनी सनातन हिंदू जागरण मंचविश्व हिंदू परिषद , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, समस्त व्यापारी मंडळ , भजन मंडळ, अणि समस्त गावकरी मंडळी आदीं सनातन हिंदू संघटनांनी या स्वाभिमानी सोहळ्यात सामील होऊन हा शुभ दिवस साजरा केला या आनंदाच्या क्षणी हजारो हिंदू बांधव भगिनी या सोहळ्यात मोठ्या भक्ती भावाने सामील होऊन प्रसन्न झाले होते ही भव्य मिरवणूक हिंदूप्रतिपालक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण केले आणि आरती करण्यात आली या नंतर मिरवणूक पुढे निघाली..
दुसर बीड नगरीतील भव्य मिरवणूक सर्व मंदिरावर जाऊन श्रीफळ हार अर्पण करून देवी देवतांच्या गजराने संपूर्ण नगर दुमदुमले होते
दुसर बीड नगरीतील प्रत्येक घराघरावर भगवा ध्वज प्रभू राम श्रीरामांचा छायांकित ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा छायांकित ध्वज जागो हिंदू जागो अशा ध्वज पताका मोठ्या दिमाखाने घराघरावर लावण्यात आल्या सायंकाळी प्रत्येक मंदिरावर हजारो दिपप्रजलित करून सारा आसमंत दीपोउत्सवाणे उजळून निघाला
हजारो दीप तेजाने उजळल्या नंतर गगनभेदी …फटाक्यांची आतिषबाजी .करण्यात आली .रंगीबेरंगी फटाके..आसमंतात…..हजारो चांदण्याचे..शिंतोडे उडवीत.या सोहळ्याला ..साजरा करत होते ..रस्त्या रस्त्यावर. सार्वजनिक रांगोळी रेखाटली होती..
सोहळा साजरा होत असताना प्रत्येक हिंदू वासियांच्या ह्रदयात साक्षात राम प्रभू संचारले असे उत्साहाचे आणि भक्तीमुळे विजय दिवसाचे भाव दिसत होते.
पाचशे वर्षाचा वनवास संपून श्रीराम प्रभू आपल्या गर्भगृहात विराजमान झाले हे भाव जाणवत होते.
हा भव्य दिवस अविश्वाणीय सोहळामोठ्या भक्ती भावाने आयोजित केला आणि उत्साहाने . साजरा करण्यात आला 🚩🚩🚩🚩🚩