महाराष्ट्र ग्रामीण

मनोज जरांगेची औकात नाही, लायकी नाही…जरांगे यांना आता कोणाकडून आव्हान

पुणे| मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी प्रचंड संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. मनोज जरांगे यांची औकात नाही, लायकी नाही… औकात असेल तर महाराष्ट्राचे सामाजिक न्यायाचे धोरण समजून घ्या. त्यासाठी जरांगे यांनी त्यांच्या लोकांना घेऊन कुठल्याही मीडियाच्या चॅनेल समोर प्रतिवाद करायला यावे, अशी आव्हान लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना दिले. मराठा आंदोलनामुळे एका रात्रीत काढलेल्या अध्यादेशावर लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड टीका केली आहे

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर महाराष्ट्रातील ओबीसी आणि व्हिजीएनटी समाज प्रचंड नाराज झाला आहे. आम्हाला डावलल जात आहे. बेदखल केले जात आहे. हाच फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे का? असा सवालही लक्ष्मण हाके यांनी केला आहे. मिंधे सरकारची किंवा शिंदे नावाच्या मुख्यमंत्रीची ही औकात आहे का?

शिवाजी महाराजांचे नाव घेता…

छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातील रयत अशी अपेक्षित होती का? छत्रपतींचे उटसूट नाव घेता आणि ओबीसी समाजातील माणसांच्या न्यायहक्कांच्या विरोधात मुख्यमंत्री रात्री, अपरात्री अध्यादेश काढतात. राज्यातील ओबीसी समाजातील लोकांना हे अजिबात आवडलेले नाही. मनोज जरांगे यांना या महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांची रयत समजून घ्येयाची असेल, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार समजून घ्यायचा असेल, महाराष्ट्राचे सामाजिक न्यायाचे धोरण समजून घ्यायचे असेल, तर चर्चेला या. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला आम्ही तयार आहोत.

तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मावळा निश्चित देईल. आता महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी हा मेंढपाळाचा पोरगा एल्गार पुकारणार असल्याचे लक्ष्मण हाके यांनी म्हटले. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी आघाडी उघडली असताना लक्ष्मण हाके समोर आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button