नेताजींनी आपले संपूर्ण जीवन देश सेवेसाठी अर्पित केले, सुरेश बुलकडे यांचे प्रतिपाद
प्रतिनिधी विठ्ठल राठोड:
दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी दुसरबीड येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली .स्वतंत्र लढ्यात नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे योगदान मोलाचे होते. आज आपण भारतीय जी जय हिन्द ची घोषणा करतो, ते घोषवाक्य देखील नेताजींनीच दिलेले आहे. नेताजींनी देशासाठी आपले संपूर्ण जीवन व प्राण अर्पण केला असे प्रतिपादन सुरेश बुलकडे यांनी जाहीर कार्यक्रमात केले.
पुढे बोलताना सुरेश बुलकडे म्हणाले
इंग्रज शासनाद्वारे जेव्हा भगत सिंह यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हा नेताजी महात्मा गांधी यांच्या कडे गेले व त्यांनी भगत सिंह यांची शिक्षा रद्द करण्यासाठी आंदोलनाची विनंती केली. परंतु महात्मा गांधी हिंसेच्या विरोधात असल्याने त्यांनी नेताजी यांच्या या विनंती कडे दुर्लक्ष केले. या प्रसंगामुळे नेताजी हे गांधीजी व काँग्रेस च्या कार्यपद्धतीने नाराज झाले.अतिशय उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला यावेळी राम जांभोरकर , सुरज बुलकडे आकाश बुलकडे जयदीप मिस्त्री नानासाहेब तौर श्रीकांत सानप हर्षल मोहिते धनु वैद्य धीरज देशमुख
ऋषिकेश केवट , दत्ता जगदाळे यांच्यासह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.