अपराध

पुणे शहर : पोलीस उपनिरीक्षकाला 40 हजाराची लाच घेताना ACB ने रंगेहाथ पकडले; पोलीस दलात खळबळ

पुणे शहर

पुणे : पुणे शहर पोलिस दलातील अलंकार पोलिस

ठाण्याच्या अंकित असलेल्या लक्ष्मीनगर पोलिस चौकीत कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण यांच्यावर 40 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी पुण्याच्या अॅन्टी करप्शन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलीसनामा ऑनलाइन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पुणे एसीबीने सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली असून काही वेळापुर्वीच ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण यांच्यावर 40 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी पुणे अॅन्टी करप्शनने कारवाई केली असल्याचे वृत्त समोर आले आहे.पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण यांनी कशाबद्दल 40 हजार रूपायाची लाच घेतली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अॅन्टी करप्शनचे अधिकारी प्रकरणाची चौकशी करीत असून लवकरच माहिती देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. मात्र, पोलिस उपनिरीक्षकावर 40 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button