महाराष्ट्र ग्रामीण

तुम्हाला उद्यापासून दुसरं सुरू करायचं आहे का? मराठा समाज आक्रमक होण्याचं खापर मुंडेंनी माध्यमांवर फोडलं

पुणे : उद्यापासून माध्यमांना काम कमी असेल. तुम्ही आजच्या दिवस तरी शांत बसा, की आता तुम्हाला दुसरं सुरू करायचं आहे? असं म्हणत कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी मराठा समाज आक्रमक होण्याला माध्यमांनाच जबाबदार धरलंय. मराठा समाजानंतर आता धनगर समाज ही आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करतोय,असा प्रश्न माध्यमांनी मंत्री मुंडेंना विचारला. यावर बोलताना, तुम्ही आजच्या दिवस तरी शांत बसा. मराठा समाजाचा प्रश्न आत्ता कुठं मिटलाय. पुढे धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी, ओबीसींचे आरक्षण आहे तसं राहावं आणि मुस्लिम समाजाला शैक्षणिक तसेच नोकरीचे आरक्षण मिळावं यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे असं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले.

माध्यमांवर फोडलं खापर

मराठा समाजाचं आम्ही आत्ताच मिटवलं आहे, त्यामुळं उद्यापासून तुम्हाला थोडं काम कमी असेल. त्यामुळं आता तुम्हाला दुसरं सुरू करायचं आहे का? असं म्हणत मुंडेंनी मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक होण्याला माध्यमांनाच जबाबदार धरलं. पण सरकारने तारीख पे तारीख देत, मराठा समाजाची दिशाभूल केली आणि त्यामुळं मनोज जरांगेंना समाजाला घेऊन मुंबई गाठावी लागली. याचा विसर मुंडेंना पडला. या मोर्चामुळं अडचणीत आलेल्या सरकारची निष्क्रियता झाकण्यासाठी, मुंडेंनी थेट माध्यमांवर आगपाखड ओखली. पुण्याच्या मावळमध्ये मुंडे आले होते. त्यावेळी पत्रकारांनी मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर छेडलं अन मुंडेंचा तोल गेला.

मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकार आणि प्रशासन घरोघरी जावून मराठा समाजाचं मागासलंपण सिद्ध करण्याचं काम करत आहे. धनगर समाजालाही आरक्षण मिळवून देण्यासाठी तसेच मुस्लिम समाजालाही नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  प्रयत्न करतोय असं धनंजय मुंडे म्हणाले. मात्र धनगर आरक्षणाचा प्रश्न विचारताच धनंजय मुंडेंचा पारा चढला आणि अप्रत्यक्षपणे मराठा आंदेलनाला आक्रमक करण्याचं खापर त्यांनी माध्यमांवर फोडलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button