‘या’ मोठ्या काँग्रेस नेत्याच्या मुलीच राम मंदिराविरोधात 3 दिवस व्रत, अखरे सोसायटीने…..
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला एक आठवडा उलटून गेला आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनात आजही राम मंदिराबद्दल उत्साह, आनंद आहे. 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्र गर्भगृहात विराजमान झाले आहेत. सर्वसामान्यांच्या या भावना असताना एका मोठ्या काँग्रेस नेत्याच्या मुलीच वर्तन बिलकुल या विरोधात आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते मणिशंकर अय्यर यांची मुलगी सुरन्या अय्यरने राम मंदिर निर्माणाच्या विरोधात तीन दिवसाच व्रत ठेवलं होतं. सनातन विरुद्ध अपशब्द सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता या विषयावरुन सोसायटीने सुरन्या अय्यर आणि मणिशंकर अय्यर यांना पत्र लिहिलं आहे. आपल्या वर्तनाबद्दल जाहीरपणे माफी मागा किंवा सोसायटी सोडून जा, असं सोसायटीने म्हटलं आहे. सुरन्या अय्यर दिल्लीच्या जंगपुरा भागामध्ये राहते.
दिल्लीच्या जंगपुरा भागात राहणाऱ्या सुरन्या अय्यरने अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात तिने लिहिल होतं की, आईच्या हातून एक चमचा मध खाऊन मी माझ व्रत तोडलं. सुरन्या अय्यरच्या अशा वक्तव्यामुळे सोसायटीतील लोक नाराज झाली. तिने माफी मागावी अशी मागणी रहिवाशांनी केली.
दुसरी मुलगी यामिनी अय्यरही चर्चेत
याच्या 15 दिवस आधी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची मुलगी यामिनी अय्यर चर्चेमध्ये आली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाने यामिनी अय्यरच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या फेमस थिंक टँकच फॉरेन कॉन्ट्रिब्यूशन रेग्युलेशन एक्ट (FCRA) रद्द केला. या थिंक टँकच नाव सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (CPR) आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही संस्था नियमांच उल्लंघन करत होती.
थिंक टँकचा इन्कम टॅक्स सर्वे झाला
सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च याआधी सुद्धा सरकारच्या रडारवर होती. या आधी या थिंक टँकचा इन्कम टॅक्स सर्वे झाला होता. मागच्यावर्षी मार्च महिन्यात गृह मंत्रालयाने CPR च FCRA लायसन्स निलंबित केलं होतं. MHA च्या FCRA विभागाने लायसन्स रद्द केलं होतं.
या काँग्रेस नेत्याचा पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जन्म
82 वर्षांचे मणिशंकर अय्यर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आहेत. ते तामिळनाडूच्या मयिलादुथुराई लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिले आहेत. त्याशिवाय राज्यसभा खासदार होते. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये मणिशंकर अय्यर यांचा जन्म झाला. सुनीता मणि अय्यर ही त्यांची पत्नी आहे. या जोडप्याला यामिनी, सुरन्या आणि सना अय्यर या तीन मुली आहेत.