14 वर्षांची असताना छेडछाड झाली, ती जखम अजूनही…; भूमी पेडणेकरचा मोठा खुलासा
मुंबई : पारंपरिक स्क्रिप्टच्या पलिकडचे सिनेमे करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर… भूमी ठरलेल्या साचाच्या पलिकडचे सिनेमे निवडते. वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडते. तिच्या या कामाचं विशेष कौतुक केलं जातं. ती बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिने एका मुलखतीत तिने तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. लहानपणी तिच्यासोबत छेडछाड झाल्याचं भूमी पेडणेकर हिने सांगितलं आहे. या घटनेचा तिच्यावर आजही परिणाम असल्याचं भूमीने सांगितलं. भूमी पेडणेकरचा भक्षक हा सिनेमा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी भूमीचा एक इंटरव्ह्यूव झाला. या इंटरव्ह्यूवमध्ये तिने खुलासा केला आहे.
भूमीसोबत काय झालं होतं?
मला आजही तो दिवस लक्षात आहे. तेव्हा वांद्र्यात एक जत्रा भरली होती. मी तेव्हा खूपच लहान होती. तेव्हा मी 14 वर्षांची होते. मी माझ्या घरच्या लोकांसोबत या जत्रेत गेली होती. मी तेव्हा चालत होते. तेव्हा माझ्या पाठीवर कुणी तरी चिमटे घेत होतं. वारंवार मला हा स्पर्श केला जात होता. तेव्हा मला कळत होतं की माझ्यासोबत काय होत आहे. जेव्हा मी मागे वळून पाहिलं तर तेव्हा तिथं कुणी नव्हतं. तेव्हा माझ्यासोबत माझ्या बिल्डिंगमधली इतर मित्रमंडळी सुद्धा होती, असं भूमीने सांगितलं.
भूमी पेडणेकर नेमकं काय म्हणाली?
जेव्हा माझ्यासोबत ही गोष्ट घडली तेव्हा मी कुणाला काही बोलले नाही. कारण त्यावेळी मला खूप मोठा धक्का बसला होता. मला तेव्हा कळत नव्हतं की माझ्यासोबत नेमकं काय झालं आहे ते. पण तेव्हा मला झालेला स्पर्श मला आजही लक्षात आहे. कारण अशा गोष्टी तुमचं शरीर कधीही विसरत नाही. अशा गोष्टी घडल्याने तुमच्या आयुष्यावर आघात होतो. हा एक असा धक्का असतो. ज्यातून तुम्ही कधीही बाहेर येत नाही, असं भूमीने यावेळी सांगितलं.
भक्षक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
भूमीचा भक्षक हा सिनेमा येत्या नऊ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ही घटना एका सत्यकथेवर आधारित आहे. या सिनेमाच्या चित्रपटाने अंगावर काटा उभा राहतो. या सिनेमात भूमी एका महिला रिपोर्टरची भूमिका साकारते आहे. जी शेल्टर होमच्या नावाखाली मुलींवर होणारे गुन्ह्यांना उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहे.