अपराध

Advocate Couple Death : राहुरी पोलिसांची ‘सिंघम’ स्टाईल; आरोपींची भर रस्त्यातून काढली धिंड

राहुरी येथील अॅड. राजाराम आणि त्यांच्या पत्नी अॅड. मनीषा आढाव यांची 25 जानेवारीला दुपारी अपहरण करून रात्री निघृण हत्या करण्यात आली. या घटनेत सराईत आरोपी किरण नानाभाऊ दुशिंग ऊर्फ दत्तात्रय (रा. उंबरे), सागर साहेबराव खांदे ऊर्फ भैया (रा. येवले आखाडा), शुभम संजीत महाडिक (रा. मानोरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे), बबन सुनील मोरे (रा. उंबरे) या पाच जणांना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.

अटक केलेला किरण हा सराईत गुन्हेगार (Crime) आहे. त्याने आणि त्याच्या पाच साथीदारांनी कट करून आढाव दांपत्याचे हत्याकांड केल्याचा राहुरी पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळले आहे. आढाव दांपत्याच्या हत्येची तीव्रता कमी करण्यासाठी हा तपास राज्य सरकारने सीआयडीकडे (CID) वर्ग केला आहे.

तत्पूर्वी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची पोलिसांनी राहुरीतून पायी धिंड काढली. राहुरी पोलिस ठाण्यापासून शनिचौक-नवीपेठ नगर-मनमाड रोडने मुळा नदीच्या पुलावर या आरोपींना पायी फिरवले. दरम्यान, अॅड. मनीषा आढाव यांची पर्स आरोपींनी पुलावरून फेकली होती. ती पर्स पोलिसांना सापडली. यानंतर आरोपींना पुन्हा नगर- मनमाड रोडने जुनी पेठ-शिवाजी चौक-शनिचौक-पोलीस ठाणे या मार्गाने पायी आणण्यात आले.पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, समाधान फडोळ, धर्मराज पाटील तसेच राहुरी पोलिसांचे मोठा बंदोबस्त यावेळी होता.फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष

आढाव वकील दांपत्याचे कोर्टातून अपहरण करून हत्या झाल्याने त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रातील वकिलांमध्ये उमटले आहेत. हा हत्याकांडात वेगवेगळी माहिती पसरत असल्याने वकिलांबरोबर समाजमनाच्या भावना देखील तीव्र होत आहेत.

वकिलांनी वकील संरक्षण अॅक्टची मागणी लावून धरली आहे. यासाठी कोर्टाच्या कामकाजापासून 3 फेब्रुवारीपर्यंत अलिप्त राहत धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) 2 फेब्रवारीला वकील शिष्टमंडळासोबत वकीलवकील संरक्षण अक्टच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर वकील संघटना आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button