चंद्रावर झोपण्यापूर्वी चंद्रायानाने केली कमाल, शेवटचा काढलेला चंद्राचा फोटो पाठविला, येथे पाहा
Japan Moon Mission : भारताच्या चंद्रयान-3 ने गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सफल लॅंडींग करुन नवा इतिहास रचला होता. या वर्षी जपानच्या चंद्रयानाने देखील चंद्रावर यशस्वी लॅंडींग करून मोजक्या देशांच्या पंक्तीत स्थान मिळविले आहे. जपानची अंतराळ संशोधन संस्था जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीने ( JAXA ) एक माहिती दिली आहे. त्यांचा स्मार्ट लॅंडर फॉर इंवेस्टिंगेटींग मून ( SLIM ) आता निष्क्रीय झाला असल्याचे JAXA ने म्हटले आहे. म्हणजे जपानचे चंद्रयान देखील आता चंद्रावर झोपले आहे. जपानचे चंद्रयान चंद्रावर ज्या भागात उतरले आहे तेथे आता रात्र सुरु झाली आहे. झोपण्यापूर्वी जपानच्या चंद्रयानाने चंद्राचा फोटो पाठविला. तो त्याने पाठविलेला शेवटचा फोटो मानला जात आहे.
जपानच्या SLIM या नावाच्या स्मार्ट लॅंडरने 1 फेब्रुवारी रोजी आपल्या ऑनबोर्ड कॅमेऱ्याने काढलेला एक फोटो पाठविला आहे. या फोटोत शिओली क्रेटरच्या उतारावर सावली दिसत आहे. याबाबत एक्स अकाऊंटवर स्पेक्ट्रोस्कोपिक इमेजिंगच्या टार्गेटच्या लेबलवाला फोटोही शेअर केला आहे. या फोटोत विविध खडकांना आणि मुळ पृष्टभागाला खडकांनी झाकलेले दिसत आहे. याबाबत संशोधन करण्यात येत आहे. जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीने ( SLIM ) चंद्रयानाशी संपर्क स्थापन केल्यानंतर तीन दिवसांनी हा फोटो जाहीर केला आहे. पॉवर बचत करण्यासाठी टीमने 20 जानेवारी रोजी रोबोटीक अंतराळ यानाला बंद केले होते. हा एका चुकीमुळे लॅंडींग करताना उलटा लॅंड झाला होता. त्यावेळी यानाचे सौर पॅनल योग्य दिशेला नव्हते, त्यामुळे हे यान वीज निर्मिती करण्यात असमर्थ होते.
जपानच्या अंतराळ संशोधकांना सुरुवातीलाच अशी निराशा आल्यानतर त्यांना काही दिवसांनी सुर्य प्रकाशाची दिशा बदलल्यानंतर लॅंडर चार्ज होईल शक्यता वाटत होती. नऊ दिवसानंतर अखेर तसे घडले. SLIM अखेर जागृत झाला. गेल्या सोमवारी अंतराळ यानाच्या मल्टी बॅंड स्पेक्ट्रल कॅमेऱ्यांच्या मदतीने क्रेटरच्या ( विवर ) चारी बाजूच्या खडकांचा अभ्यास केला. JAXA ने मुद्दाम या जागेची लॅंडींगसाठी निवड केली होती. कारण येथून चंद्राच्या निर्मितीचे रहस्य शोधणे शक्य होणार आहे.
JAXA चे ट्वीट -1येथे पाहा –
आता चंद्रावर या भगात रात्र सुरु झाली आहे. जपानच्या चंद्रयानाला पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी स्पेस एजन्सी JAXA ला आता 14 दिवसांची वाट पाहावी लागेल. कारण चंद्राचा एक दिवस पृथ्वीवरील 14 दिवसांएवढा असतो. याची सुरुवात 15 फेब्रुवारी पासून होणार आहे. परंतू एजन्सीला अनुकुल प्रकाश आणि तापमानासाठी आणखी वाट पाहावी लागेल. शून्य ते मायनस 130 डिग्री तापमानाचा सामना चंद्रयानाला करावा लागणार आहे. त्यातून ते पुन्हा चार्ज होईल की नाही हे पहावे लागणार आहे. जपानने जेवढ्या कालावधीसाठी आणि कामगिरीसाठी चंद्रयान पाठविले होते. अर्थात ती वेळ आणि कामगिरी पूर्ण झाली आहे.