IND vs ENG 2nd Test | जसप्रीत बुमराहच्या 6 विकेट्स, इंग्लंडचा 253 वर कार्यक्रम, टीम इंडियाला मोठी आघाडी
विशाखापट्टणम | दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऑलआऊट 396 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्याच दिवशी पहिल्या डावात ऑलआऊट केलं आहे. जसप्रीत बुमराहच्या धारदार बॉलिंगसमोर इंग्लंडचा डाव 55.5 ओव्हरमध्ये 253 धावांवर आटोपला. टीम इंडियाला अशाप्रकारे पहिल्या डावात 143 धावांची मोठी आघाडी मिळाली. इंग्लंडकडून झॅक क्रॉली याने 76 आणि बेन स्टोक्स याने 47 धावांची खेळी केली. तर टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या.
इंग्लंडची बॅटिंग
इंग्लंडने टीम इंडियाच्या 396 धावांच्या प्रत्युततरात पहिल्या 2 विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. झॅक क्रॉली-बेन डकेट या सलामी जोडीने 59 धावांची भागीदारी केली. तर झॅक क्रॉली आणि ओली पोप या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 55 रन्स जोडल्या. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ठराविक अंतराने झटके देत ऑलआऊट केलं. इंग्लंडकडून झॅक क्रॉली आणि बेन स्टो्कस या दोघांव्यतिरिक्त एकालाही मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडच्या चौघांना दुहेरी आकडा गाठण्याआधीच गुंडाळण्यात आलं. तर चौघांनी 20 पेक्षा जास्त धावा करत छोटेखानी खेळी केली.
टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने 6 विकेट्स घेत कसोटी क्रिकेटमध्ये 150 विकेट्सचा टप्पा पार केला. तर कुलदीप यादव याने 3 विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल याने एकमात्र पण झॅक क्रॉली याची महत्त्वाची विकेट घेतली. आता टीम इंडिया 143 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर किती धावांचं आव्हान ठेवते, याकडे क्रिकेट चाहत्यांना लक्ष असणार आहे.
इंग्लंडं पॅकअप
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.