अपराध

निगडीतील स्पावर पोलिसांचा छापा; 4 तरुणींची सुटका

‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी धाड टाकून पर्दाफाश केला असून चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे. छापा टाकण्यात आलेल्या स्पाच्या लेडी मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले आहे. निगडीतील ‘फिनिक्स स्पा’वर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार सोनाली विलास माने (वय-30) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याआधारे स्पा मॅनेजर महिला आरोपी, स्पा मालक दिनेशकुमार गुप्ता (वय ३०, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. निगडी, पिंपरी चिंचवडमध्ये स्पा च्या नावावर काही दलाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुलींना आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना मिळाली. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इन्स्पेरिया मॉलच्या चौथ्या मजल्यावरील दुकान क्रमांक 403, 404 मधील फिनिक्स स्पामध्ये बनावट ग्राहक पाठवून याची खातरजमा करण्यात आली. खात्री झाल्यानंतर पथकाने अचानक छापा टाकला. त्यावेळी आरोपींच्या ताब्यातून चार मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. आरोपींनी पीडित मुलींना पैशाचे आमिष दाखवून आपल्या स्पा सेंटरमध्ये ठेवले. त्यांच्याकडून आरोपी वेश्या व्यवसाय करून घेत होते. यातून कमावलेल्या पैशातून तो आपला उदरनिर्वाह करत असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपीला ताब्यात घेऊन निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी मारुती करचुडे, भगवंता मुठे, यांच्या पथकाने ही कारवाई केली. गणेश करोटे, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे, सोनाली माने

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button