अपघात

पुणे : येरवड्यात भीषण आग, मोठे नुकसान

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत

येरवडा : येरवड्यातील बालाजी नगर येथील साऊंड बॉक्स निर्मिती कारखान्याला शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कारखान्यातील शेजारील लाकडी साहित्य आणि साउंड बॉक्सलाही आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत गोदामात ठेवलेले लाकडी साहित्य पूर्णत: भस्मसात झाले असून, आतील इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button