अपराध

*शटर उचकटून चोऱ्या करणारी टोळी जेरबंद*

: येरवडा तसेच पुणे शहरात ठीक ठिकाणी दुकानाचे शटर उचकटून घरफोड्या करणाऱ्या टोळीला येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने शिताफिने सापळा रचून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले असून सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.तौसीफ बशीर शेख (वय २५ रा. कोंढवा, पुणे), अमोल किसन अवचरे (वय २८ रा. काशेवाडी, पुणे ), अजीम सलीम शेख (वय २४ रा. कासेवाडी पुणे), प्रथमेश उर्फ पत्या प्रमोद कांबळे (वय २४ रा. कासेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडिया बंगला नगर रोड तसेच ब्रह्मा सनसिटी या भागात काही संशयित इसम चोरी करण्याच्या उद्देशाने आले असल्याची माहिती येरवडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस हवालदार अमजद शेख, तुषार खराडे, अंमलदार अनिल शिंदे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे यांना गोपनीय बातमी मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने तात्काळ दोन्ही ठिकाणी जाऊन संशयीत व्यक्तींना पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत दोन तसेच कोंढवा व स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत प्रत्येकी एक अशा एकूण चार दुकानाचे शटर उचकटून चोरी केल्याची कबुली दिलीसदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, गुन्हे निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, पोलीस हवालदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे तुषार खराडे,किरण घुटे, अमजद शेख कैलास डुकरे, पोलीस नाईक सागर जगदाळे अंमलदार अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button