अपराध

*धानोरी येथे शिवजयंती मध्ये मारहाण करणाऱ्यांना ४ जणांना अटक*

धानोरी भैरवनगर येथे मोरया ग्रुप मंडळाच्या शिवजयंती कार्यक्रमाच्या वेळी दीपक अवदेश शर्मा व त्याचा मित्र आदित्य नावगिरे हे शिवजयंतीचा कार्यक्रम पाहत असताना दीपक शर्मा याचा मित्र निखिल साळवे, आयुष सोंडे, शशी क्षीरसागर व अनिरुद्ध चव्हाण हे तेथे आले व दीपक शर्माला जरा बाजूला चल असे म्हणू लागले परंतु ती दीपक शर्मानेनकार देताच निखिल साळवे त्याच्या मित्रांनी त्याला लता भुकेने मारहाण करण्यास सुरुवात केली. निखिल साळवे याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने दीपक शर्मावर हल्ला केला. हल्ल्यामध्ये दीपक शर्मा याला गंभीर जखमी केले. यावेळी दीपक शर्मा याचा मित्र अनिरुद्ध चव्हाण हा तिथून पळून गेला त्यामुळे बचावला. याप्रकरणी दीपक शर्मा यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून त्याच्यावर ससून रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
यावेळी घटना घडल्याचे समजताच घटनास्थळी पारी मंडळ 4 चे उपायुक्त विजयकुमार मगर , सह पो उपायुक्त आरती बनसोडे, विश्रांतवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव , उपनिरीक्षक नितीन राठोड , एपी आय अन्सार शेख उपनिरीक्षक सुधा चौधरी यांनी भेट दिली.
पुढील तपास उपनिरीक्षक गपले करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button