अपघात

पुणे : चिंचवडमध्ये लक्झरी कारची खासगी स्कूल बसला धडक, दोन मुले जखमी

पिंपरी चिंचवड सायन्स पार्कजवळील बीआरटी लेनवर आज दुपारी स्कूल बस आणि खासगी कारची धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात आज दुपारी 12.30 वाजता झाला. अपघाताची धडक एवढी होती की स्कूल बसच्या समोरील बाजूचे तुकडे झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बस मुलांना शाळेत घेऊन जात असताना या घटनेत ते जखमी झाले. या घटनेत दोन मुले जखमी झाली आहेत. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या बसमध्ये 15 विद्यार्थी प्रवास करत होते. कार चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी उपस्थितांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button