अपराध

मुंबईत हत्या: 89 वर्षीय महिलेची हत्या, मालाडच्या घरात सापडला कुजलेला मृतदेह; तपास चालू आहे

मुंबई :- मालाडमध्ये एका 89 वर्षीय महिलेची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शांताबाई कुराडे असे मृत महिलेचे नाव असून घरात तिचा कुजलेला मृतदेह आढळून आला. मालाड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, फरार झालेल्या मारेकऱ्याचा शोध सुरू आहे. आर्थिक वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताबाई या मालाड येथील सुभाष डी चाळमधील खोली क्रमांक आठमध्ये राहत होत्या. भीक मागून ती आपला उदरनिर्वाह करत होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button